स्वावलंबन , स्वाभिमान, स्वदेश प्रेम ..हेच आमचे ब्रीद...!

संस्थेचे ध्येय व उद्देश

1) बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक विद्यालेय, माध्यमिक विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये व महाविद्यालये सुरू करणे. तांत्रिक, बिगर तांत्रिक, कृषि, व्यावसायिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, व्यस्थापन, माहिती तंत्रज्ञान, संगणक, शिक्षणशास्त्र, सैनिकी शिक्षण, पर्यावरण व जैव तंत्रज्ञान इत्यादी स्वरूपाच्या शिक्षणाची सोय करणे.

2) कृषि, विज्ञान, व्यापार, औद्योगिक तंत्रविज्ञान, माहिती तंत्रज्ञान, वैद्यकीय सेवा इत्यादी क्षेत्रातील प्रश्नांचा सखोल विचार करून त्यामध्ये आधुनिकीकरण आणून समाजाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक विकास साधण्यासाठी संशोधन केंद्रे, प्रयोगशाळा, कार्यशाळा, इत्यादींची स्थापना करणे.

3) जागतिकीकरण व खुले आर्थिक धोरण यांच्या अनुषंगाने रोजगाराभिमुख आधुनिक तंत्रवैज्ञानिक कौशल्ये विकसित करणारे अभ्यासक्रम सुरू करणे व सोय करणे.

4) कृषि व औद्योगिक उत्पादन आणि शिक्षण यामधील एकजिनसीपणाच्या गरजेची समाजामध्ये जागृती निर्माण करुन तसे अभ्यासक्रम विकसित करणे व सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे.

5) ग्रामीण भागातील शेती व शेतीपुरक व्यवसायांच्या वकासासाठी कौशल्ये प्रात्यक्षिकाद्वारे देण्याची सोय करण्यासाठी प्रयत्न करणे.

6) संस्थेच्या विविध शाखांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्रता, आर्थिक स्वयंपूर्णता यासंबंधी जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे.

7) विविध स्तरावरील व अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी व गुणवत्ता वाढविण्यासाठी आपश्यक उपक्रम सुचविणे व त्याची कार्यवाही करणे.

8) काळानुरूप नवनविन अभ्यासक्रम विकसित करून उपलब्ध असणारे निरंतर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शैक्षणिक विकासमंडळ चालू करणे.

9) सिशिक्षित बेकारांना स्वयंरोजगासंबंधी मार्गदर्शन करणे. उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्यासंबंधी माहिती देणे. त्यांनी स्वीकारलेल्या स्वतंत्र उद्योगातील अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन करणे.

10) महिलांना स्वावलंबी जीवन जगता यावे म्हणून त्यांच्या शिक्षणाची सोय करणे, शिवण, नर्सिंग, डेअरी, होम सायन्स, आदी स्वरूपाचे धंदेशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करून महिलांना स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करणे.

11) गरजू व हुषार विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाच्या काळात त्यांच्या निवासाची व भोजनाची अल्पसा मोबदला घेऊन अथवा ना नफा ना तोटा तत्त्वावर सोय करणे अथवा सोय उपलब्ध करून देणे.

12) हुशार व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी श्रमाच्या मोबदल्यात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे.

13) साहित्या, कला, क्रीडा, खेळ , वर्तृत्व आदी क्षेत्रात पारंगतता मिळविणाऱ्या, विक्रम स्थापन करणाऱ्या व लौकिक संपादन करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार व गौरव करून त्यांना उत्तेजन देणे.

14) समाजातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रश्नांचा साकल्याने विचार करून त्यावर इलाज शोधन काढण्यासाठी प्रोत्साहन देणे. त्यासाठी सभा, संमेलने, परिषदा, आयोजित करणे, परिपत्रके, माहितीपत्रके, टाचण, टिप्पणी, पत्रिका, पुस्तके इत्यादी छापून वाटणे.

15) इतर शैक्षणिक कार्ये करणे.

Developed By B.C.A. Department And LanguageHubWeb IT Solution Year-2022-23