स्वावलंबन , स्वाभिमान, स्वदेश प्रेम ..हेच आमचे ब्रीद...!
Card image
अध्यक्ष- आमदार अरुण गणपती लाड

भारतीय स्वातंत्र्यलढा पर्वाचे सुवर्णपान म्हणजे सातारचे प्रतिसरकार! सत्यशोधक, पुरोगामी व परिवर्तनवादी विचारांच्या या सशस्त्र लढ्याचे प्रेरणास्त्रोत होते क्रांतिसिंह नाना पाटील! आणि ...

गांधी एज्युकेशन सोसायटी, कुंडल

सत्येश्वर राजाची पांढरी ही "कुंडल" ची प्राचिन ओळख! वीरभद्र व पार्श्वनाथ ही दोन अनुक्रमे लिंगायत आणि जैन धार्मिक स्थळे असणाऱ्या सह्याद्रीच्या पायथ्याला वसलेले गाव! औंध संस्थानच्या तालुक्याचा गाव! उद्योगरत्न लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या किर्लोस्करवाडीच्या कारखान्यामुळे औद्योगिकरणाची देशभर ओळख झालेला गाव! औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी आणि त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब पंतप्रतिनिधी ह्यांच्या राष्ट्रीय मनोवृत्तीने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भारावलेल्या अनेक क्रांतिकराकांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेला क्रांतिकारक गाव! 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात पारतंत्र्यातही त्यावेळच्या सातारा जिल्ह्यातील 600-700 खेड्यातील जनतेला स्वातंत्र्यातील सुराज्याची ओळख करून देणाऱ्या प्रतिसरकारच्या राजधानीचा गाव! धगधगत्या आणि स्वातंत्र्यासाठी समर्पित भावनेने इंग्रजी साम्राज्याशाही सत्तेशी दोन हात करणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने भारताला गुलामगिरीत लोटणाऱ्या इंग्रजांना सहाय्य करणाऱ्या इंग्रज धार्जिण्यांना जरब बसवणाऱ्या शूरवीरांचा गाव! अशी कुंडलची ओळख निर्माण करणाऱ्या स्वराज्यप्रेमी आणि समाजनिष्ठेने भारावलेल्या क्रांतिकारकांनी एकत्र येऊन शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या मुलांना स्वावलंबन, स्वाभीमान आणि स्वदेशप्रेमाचे धडे देऊन, त्यांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी 1949 साली गांधी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि 1950 सालापासून औंधसंस्थानची "मिडल इंग्लिश स्कूल' ही शाळा राज्याच्या शिक्षण खात्याकडून चालवण्यास घेतली. प्रारंभीच्या काळात औंधसंस्थानचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी, बॅरिस्टर आप्पासाहेब पंतप्रतिनिधी, नामदार यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील, संस्थानचे मंत्री बाबुराव गोविंद लाड, वि. द. घाटे, शंकरराव किर्लोस्कर, शंतनुराव किर्लोस्कर, प्रभाकरपंत किर्लोस्कर, ओगले ग्लासचे मॅनेजर सदाशिवराव पाध्ये, क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड आणि स्वातंत्र्य आंदोलनात जीवाची पर्वा न करता देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देणाऱ्या अनेक क्रांतिकारकांनी संस्थेच्या वाटचालीमध्ये बहुमोल असे योगदान दिले आहे. स्वातंत्र्य आंदोलनात आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने अतुलनीय कामगिरी करणाऱ्या क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड ह्यांनी 1957 ते 1968 या कालावधीत सुरूवातीच्या काळात मुंबई राज्याचे आणि नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत व विधानपरिषदेत कष्टकरी, शेतकरी, कामगारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न पोटतिडकीने मांडले आणि ते सोडविण्यासाठी सरकारला भाग पाडण्यासाठी संघर्षाची भूमिकाही घेतली.

Developed By B.C.A. Department And LanguageHubWeb IT Solution Year-2022-23